चावरे विद्यालयाच्या संघाची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चावरे विद्यालयाच्या संघाची निवड
चावरे विद्यालयाच्या संघाची निवड

चावरे विद्यालयाच्या संघाची निवड

sakal_logo
By

चावरे विद्यालयाच्या संघाची निवड
घुणकी : चावरे (ता. हातकणंगले) चावरे माध्यमिक विद्यालयाच्या अटल टिकरिंग लॅबमधील रोबोटिक संघाची दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. रोबोस्टाँर्मस संस्थेमार्फत कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स प्रदर्शन आयोजित केले होते. यात सुमारे शंभर रोबोटिक्स स्पर्धक महाराष्ट्रातून सहभागी झाले. यामधून दहा स्पर्धकांचा संघ दिल्ली येथे ७ व ८ जानेवारीला होणाऱ्या नॅशनल रोबोटिक्स प्रदर्शनासाठी निवडले. यामध्ये चावरे माध्यमिक विद्यालयाच्या अटल टिकरिंग लॅबमध्ये तयार केलेल्या रोबोटची निवड झाली आहे. संघामध्ये हर्षद मोहिते, ओम जाधव, केदार माने, सम्राट महाडिक हे विद्यार्थी सहभागी झाले.