प्रा. तांबोळी, प्रा. खामकर यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. तांबोळी, प्रा. खामकर यांचा गौरव
प्रा. तांबोळी, प्रा. खामकर यांचा गौरव

प्रा. तांबोळी, प्रा. खामकर यांचा गौरव

sakal_logo
By

07811
प्रा.तांबोळी,
प्रा. खामकर
--------
प्रा. तांबोळी, प्रा. खामकर यांचा गौरव

घुणकी, ता. २५ : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे प्रा. शोएब तांबोळी व प्रा. अक्षय खामकर यांना शैक्षणिक व प्लेसमेंट क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असोसिएशन’तर्फे पुरस्काराने सन्मानित केले.
सोलापूर येथे झालेल्या ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी आणि एच.आर प्रतिनिधी परिसंवाद-२०२२’ मध्ये प्रा. शोएब तांबोळी यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘शिक्षा गौरव पुरस्कार’ने सन्मानित केले. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्षेत्रात सहा वर्षांत केलेल्या कार्याबद्दल ‘इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग अँड प्लेसमेंट लीडर ऑफ द इयर २०२२’ या पुरस्काराने गौरवले. दोन्ही पुरस्कारांबद्दल टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी अभिनंदन करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.