Mon, March 27, 2023

लक्ष्मी सरस्वती महिला पतसंस्थेत हळदीकुंकू
लक्ष्मी सरस्वती महिला पतसंस्थेत हळदीकुंकू
Published on : 6 February 2023, 11:11 am
लक्ष्मी-सरस्वती महिला पतसंस्थेत हळदी-कुंकू
घुणकी : प्रत्येक महिलेने आपला संसार, याचबरोबर स्वाभिमान जपणे काळाची गरज आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने यांनी किणी (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केले.
किणी येथील लक्ष्मी-सरस्वती महिला पतसंस्थेच्या हळदी-कुंकू समारंभात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नीता चव्हाण होत्या. न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल अमृता जाधव यांचा सत्कार केला. नीता चव्हाण, अमृता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा आक्काशानी पाटील, उपाध्यक्षा शिरीन बिजली, संस्थापिका रंजना पाटील, स्मिता पाटील, अरुणा पाटील आदी उपस्थित होते. स्वप्नाली पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऋचा माने हिने सूत्रसंचालन केले. संचालिका संगीता पाटील यांनी आभार मानले.