विजडम फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद

विजडम फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद

08099
वाठार तर्फे वडगाव येथील वीजडम फाउंडेशन व भारतीय युवाशक्ती ट्रस्टच्या, नेहरू युवा केंद्र कोल्हापूर वतीने आयोजित उद्योजकता मार्गदर्शन शिबिरात उद्योजक पुरस्काराने पृथ्वी तांबवेकर यांना सन्मानित करताना आमदार राजूबाबा आवळे. शेजारी पल्लवी कोरगावकर, कौस्तुभ गावडे, प्रा. अजय मस्के,व्ही. एन. देशपांडे, तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पोवार आदी.
----
वीजडम फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद
पल्लवी कोरगावकर; वाठार तर्फे वडगावला उद्योजकता शिबिर
घुणकी, ता. २६ : ग्रामीण भागातल्या युवकांना उद्योजक बनवण्यासाठी वीजडम फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजिका पल्लवी कोरगावकर यांनी वाठार तर्फे वडगाव (ता. हातकणंगले) येथे केले.
वाठार तर्फे वडगाव येथील वीजडम फाउंडेशन व भारतीय युवाशक्ती ट्रस्टच्या नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्‍या वतीने आयोजित उद्योजकता मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या. आमदार राजू आवळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे होते. साऊंड कास्टिंगचे अध्यक्ष व्ही. एन. देशपांडे यांनी ‘युवकांना रोजगार निर्मिती ओळख व गरज’ याविषयी, बँक ऑफ बडोदाचे प्रशांत शिंदे यांनी ‘विविध योजना व बँकांची’, धैर्यशील देसाई, शरद जोशी यांनी ‘उद्योगातील संधी व कौशल्य’ याविषयी मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजकांना गौरवण्यात आले.
जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश शेळके, संजीवनी पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. एस. एन. जैन, वाठारच्या सरपंच तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पोवार, पुष्पांजली क्षीरसागर, विरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. वीजडम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अजय मस्के यांनी स्वागत व प्रास्ताविक करून उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे माहिती सांगितली. संदीप चौगुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com