‘डीवायपी’ चा मुदाक्ष, ग्लोबल फॉर्चुन शी करार

‘डीवायपी’ चा मुदाक्ष, ग्लोबल फॉर्चुन शी करार

08125
तळसंदे : येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात करारावेळी कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मुदाक्षचे कुलदीप केवलानी, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डॉ. मुरली भूपती, डॉ. शुभांगी जगताप, डॉ. रणजित पाटील आदी.
-----
‘डीवायपी’ चा मुदाक्ष, ग्लोबल फॉर्चुन शी करार
घुणकी, ता. २८ : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाने व मुदाक्ष टेक अॅडव्हायजर प्रायवेट लिमिटेड, मुंबई आणि ग्लोबल फॉर्चुन मिशन इंडिया प्रायवेट लिमिटेड, पुणे या दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार झाला.
या करारामुळे विद्यापिठाच्या एमबीए फायनान्स व एमबीए ऍग्री फायनान्स मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, जोड प्रकल्प, प्रशिक्षण, प्रगत संशोधन, इंटर्नशिप अशा बहूआयामी बाबी राबवण्यात येणार आहेत. ‘मुदाक्ष’ चे व्यवस्थापक कुलदीप केवलानी यांनी कंपनीबद्दल माहिती दिली. ‘ग्लोबल फॉर्चुन मिशन इंडिया’ च्या संस्थापक आणि संचालक सुषमा कोळवणकर इम्पोर्ट आणि एक्स्पोर्टमध्ये काम करतात. व्यवस्थापन क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक नव्या गोष्टी तसेच जागतिक अनुभव या माध्यमातून शिकता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर उत्तम दर्जाचे प्रशिक्षण व इंटर्नशिप संधी देण्यासाठी या दोन्ही करारांचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांनी मार्गदर्शन केले. हा करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कॉमर्स अँड मॅनेजमेन्ट विभागाच्या डीन डॉ. मुरली भूपती, एमबीए ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट विभागाच्या असोसिएट डीन डॉ. शुभांगी जगताप यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com