प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपालांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपालांना प्रशिक्षण
प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपालांना प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपालांना प्रशिक्षण

sakal_logo
By

08131
तळसंदे : येथील डी. वाय. पाटील फार्म येथे प्रशिक्षणासाठी वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
------
प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपालांना प्रशिक्षण
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी फार्मवर आयोजन
घुणकी, ता. २: महाराष्ट्र शासन वन विभाग, कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) वनशिक्षा निर्देशालय, डेहराडून यांच्याकडून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपालांचे एक दिवसीय प्रशिक्षण डी. वाय. पाटील फार्म येथे झाले. केरळ व बंगाल येथील निवड झालेल्या वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थींनी प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण घेतले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र व डी. वाय. पाटील कृषी फार्म तळसंदेतर्फे या प्रशिक्षणाचे संयोजन केले. प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारच्या भाजीपाला, शोभिवंत झाडांची रोपवाटिका, फळ रोपवाटिका तसेच फार्मवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा जनावरांचा गोठा, गांडूळ खत, अझोला प्रकल्प, आधुनिक हरितगृह यांची माहिती दिली. त्याचबरोबर रोपवाटिका, फळ लागवड, नारळ बागेतील केळी व मसाला पिकांची लागवड, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान त्याचबरोबर एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाबद्दल समक्ष प्लॉटवर माहिती दिली. फार्म हेड अमोल गाताडे यांचे सहकार्य लाभले. कृषी विज्ञान केंद्र येथे केंद्राचे कार्य, विविध पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, विविध कृषी योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर डी. वाय. पाटील फार्मवरील कृषी संलग्न प्रकल्पांना भेट घडवून सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थीना फार्म हेड अमोल गाताडे, दीपक पाटील, सुधीर सूर्यगंध, निलेश पाटील व राजवर्धन सावंत-भोसले यांनी मार्गदर्शन केले.