
कृषी बायोटेक घटकांना कृषी वर्गवारी लावुन वीज कपात व विद्युत कर माफ करावा. वीज आयोगाचे महावितरण ला यावर खुलासा करण्याचे निर्देश. बायोटेक घटकांना कृषी वर्गवारी लावुन वीज कपात व विद्युत कर माफ करावा. वीज आयोगाचे निर्देश
०८१३४
अक्षय पाटील
-----
रोपवाटिका, ग्रीन हाऊसना
विद्युत कर माफ
वीज आयोगाचे निर्देश; कृषी वर्गवारीचे आदेश
घुणकी, ता. ४ : रोपवाटिका, ग्रीन हाऊस, टिश्यूकल्चर बायोटेक यांच्या वीज दरवाढबाबत असोसिएशन ऑफ प्लांट टिशू कल्चर इंडस्ट्रीजने वीज आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची सुनावणी होऊन बायोटेकसह सर्व घटकांना कृषी वर्गवारी लावून वीज कपात व विद्युतकर माफ करावा; असे निर्देश वीज आयोगाने दिले आहेत. याबाबतची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले, महावितरणने दाखल केलेल्या मध्यवर्ती वीज दरवाढ याचिकेवर आयोगाने लोकांचे मत व हरकती ऐकण्यासाठी जनसुनावणी
झाली. तत्पूर्वी आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे देण्यासाठी मुदत दिली होती. यावर्षी प्रथमच ऑनलाइन सुनावणी घेतली. यामध्ये असोसिएशन ऑफ प्लांट टिशू कल्चर इंडस्ट्रीजतर्फे बिलिंग टेरीफसंदर्भात हरकती दाखल केल्या होत्या. श्री. पाटील यांनी २००२, २०१४ शासन निर्णय बायोटेक पॉलिसी २००२ इत्यादी शासकीय संदर्भ व पुराव्याकडे आयोगाचे लक्ष वेधले. मुख्यत्वे शासन निर्णयात टिश्यूकल्चर, रोपवाटिका, ग्रीन हाऊसेस यांना कृषी पंपाचे बिलिंग टेरिफ लावण्याबाबत स्पष्ट सूचना असताना महावितरणने वेगळी वर्गवारी करून एक ते दीड रुपये युनिटमागे जादा दर लावला आहे. बायोटेक पॉलिसी २००२ नुसार मध्ये कृषी वर्गवारी लावावी, वीज कपातीपासून सुटका द्यावी व विद्युतकर माफ करावा असे स्पष्ट निर्देश आहेत. याकडे श्री. पाटील यांनी आयोगाचे लक्ष वेधले. शासन निर्णय असूनही महावितरणने स्पष्टीकरण मागवून घेतो, असे सांगितले. आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा असे सांगितले.
चौकट
टेरिफ सवलतीची अंमलबजावणी व्हावी
महाराष्ट्रातील फळ-पिकांबाबत उत्पादन वाढीत निरोगी रोपे पुरवठा करणाऱ्या टिश्यूकल्चर कंपन्यांचा सहभाग मोठा आहे. टिश्यूकल्चर रोपवाटिका व ग्रीन हाऊसेसना कायद्याने टेरिफ सवलत आहे. त्याची अंमलबजावणी महावितरण केलेली नाही. तसे केल्यास महाराष्ट्रातील सर्व टिशू कल्चरल ॲप नर्सरी ग्रीन हाऊसेस यांना कृषी पंपाचा दर लागू होईल व आजच्या स्पर्धात्मक जगात या कंपन्या तग धरू शकतील हेही हे देखील आयोगाला सांगितले.