Sat, April 1, 2023

''लक्ष्मी वारणा’ची निवडणूक बिनविरोध
''लक्ष्मी वारणा’ची निवडणूक बिनविरोध
Published on : 5 March 2023, 12:45 pm
‘लक्ष्मी वारणा’ची निवडणूक बिनविरोध
घुणकी, ता. ५ : पारगाव (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक वारणा समूहाचे नेते, आमदार डॉ. विनय कोरे व तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शहाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंडलिक पिंपळकर यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवड झालेले संचालक असे- इंद्रजित पाटील, बळवंत पाटील, दिलीप पाटील, जगन्नाथ पाटील, बाबासाहेब पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील, रवींद्र पाटील, शोभा पाटील, संध्या नेर्लेकर, बाळासाहेब कोळी, हिंदूराव सिद.