आर. डी. बापूंचे विचार जपले जातील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर. डी. बापूंचे विचार जपले जातील
आर. डी. बापूंचे विचार जपले जातील

आर. डी. बापूंचे विचार जपले जातील

sakal_logo
By

08141
निलेवाडी: आर. डी. घाटगे गौरव ग्रंथ प्रकाशन प्रसंगी पी. आर. पाटील, दौलत देसाई, विनय कोरे, शेखर गायकवाड, राजाराम घाटगे, बबन टोपुगडे, अमेय घाटगे, शामराव पाटील, पल्लवी पाटील, विद्या घाटगे, वंदना गायकवाड व घाटगे कुटूंबीय व सरपंच माणिक घाटगे व गौरव समिती सदस्य आदी.
------
आर. डी. बापूंचे विचार जपले जातील
डॉ. विनय कोरे; निलेवाडी येथे माजी प्राचार्य आर. डी. घाटगे यांचा गौरव
घुणकी, ता.५ : निलेवाडीच्या बदलाचा एक प्रमुख साक्षीदार म्हणून आर. डी. बापूंचे विचार जपले जातील. भावी पिढीत अनेक आयएएस व आयपीएस घडवण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे मत वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.
निलेवाडी (ता. हातकणंगले) कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम तथा आर. डी. घाटगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘एका बॅचचे १३ आयएस, आयपीएस अधिकारी ऑल इंडिया सर्विसमध्ये आहेत. यावरून घाटगे यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते.’ माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले,‘नैसर्गिक आपत्तीवेळी कमी वेळात जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. ही काम करण्याची प्रेरणा मला आर डी घाटगे यांच्या माध्यमातून मिळाली.’ राजाराम घाटगे म्हणाले, ‘निलेवाडी ही माझी जन्मभूमी असून गावामध्ये अमृत महोत्सव साजरा केल्याचा आनंद आहे.’ समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ७५ हजार रुपयांचा धनादेश सरपंच माणिक घाटगे यांच्याकडे सुपूर्द केला.
साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी सरपंच सुभाष भाटकर, अमृता जाधव, पल्लवी पाटील, माजी प्राचार्य डॉ. एम. बी. जुई यांची भाषणे झाली. आर.डी. घाटगे बापू गौरव ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले. राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, निलेवाडीचे सरपंच माणिक घाडगे, गौरवांक समितीचे अध्यक्ष सुभाष भापकर, उपसरपंच शहाजी बोरगे, अमर घाटगे आदी उपस्थित होते. विजयकुमार जाधव-पाटील यांनी आभार मानले.