किणीतील तलाव संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून २ कोटी १९ लाख रुपये मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणीतील तलाव संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून २ कोटी १९ लाख  रुपये मंजूर
किणीतील तलाव संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून २ कोटी १९ लाख रुपये मंजूर

किणीतील तलाव संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून २ कोटी १९ लाख रुपये मंजूर

sakal_logo
By

किणीतील तलाव संवर्धनासाठी
२ कोटी मंजूर ः संजय पाटील

घुणकी, ता. १६: राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेतून हातकणंगले तालुक्यातील किणी येथील तलाव संवर्धनासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकारातून २ कोटी १९ लाखांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती संजय पाटील यांनी ''सकाळ''शी बोलताना दिली.
किणी येथे तलाव आहे. संजय पाटील व तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी तलाव संवर्धनासाठी पाठपुरावा केला. खासदार धैर्यशील माने यांच्याकडेही या तलावाच्या संवर्धनासाठी पाठपुरावा केला. यानंतर तलावाच्या संवर्धनासाठी १७ मार्च २०२२ रोजी २ कोटी ८६ लाख १९ हजार ७९८ रुपयांचा प्रस्ताव दिला. सुकाणु समितीच्या शिफारशीनुसार या प्रस्तावास ३१ मार्च २०२२ रोजी तत्वत्तः मान्यता मिळाली. या अनुषंगाने कोल्हापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तलाव संवर्धनाचा २ कोटी ५० लाखांचा सुधारीत प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पाठवला.
सुकाणू समितीच्या शिफारशीनुसार या तलावाच्या संवर्धनासाठी कोटी १९ लाखांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. ही माहिती मिळताच नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
--------
तलाव हे गावचे वैभव असल्याने तलावाच्या संवर्धन होणे गरजेचे होते. आता प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरू होईल. संवर्धनातून गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
-संजय पाटील