पाणंदी रस्त्याच्या मजबुतीकरणावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणंदी रस्त्याच्या मजबुतीकरणावर भर
पाणंदी रस्त्याच्या मजबुतीकरणावर भर

पाणंदी रस्त्याच्या मजबुतीकरणावर भर

sakal_logo
By

08184
घुणकी : आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार केशव सनदे यांनी केला. सुभाष जाधव, धोंडिराम सिद, आनंदराव पाटील, अशोकराव जाधव, रमेश पाटोळे, शहाजी सिद, संजय बुढ्ढे उपस्थित होते.
-----
पाणंदी रस्त्याच्या मजबुतीकरणावर भर
आमदार राजूबाबा आवळे; घुणकीमध्ये पाणंद मुरमीकरण प्रारंभ
घुणकी, ता. २२: शेतकऱ्यांच्या मालास बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या पाणंदी रस्त्यांचे मजबुतीकरणावर भर देण्यात येईल अशी ग्वाही आमदार राजूबाबा आवळे यांनी येथे दिली.
घुणकी येथील देशपांडे पाणंद, डाग पाणंद, भुईगल्ली पाणंदच्या मुरमीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. पावसाळ्यात देशपांडे पाणंद, डाग पाणंद, भुईगल्ली पाणंदी या रस्त्यावरून ये जा करताना शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. पाणंद रस्त्याचे मुरमीकरण झाल्याने शेतकऱ्यांना वाहतुकीस मदत होणार आहे. तिन्ही पाणंदीच्या मुरुमाकरणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर केल्याचे आमदार आवळे यांनी सांगितले.
वारणाचे संचालक सुभाष जाधव, धोंडिराम सिद, माजी पोलिस पाटील आनंदराव पाटील, माजी उपसरपंच अशोकराव जाधव, केशव सनदे, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी सिद, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब मोरे, जालिंदर पोवार, संजय बुढ्ढे, संपत सिद, संजय गुरव, मानसिंग माने, बाजीराव माने आदी उपस्थित होते.