
उत्तम समाज निर्मितीसाठी वाचन अत्यावश्यक
08214
तळसंदे : पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करताना डॉ एस आर पावसकर , आर एस पवार, प्रकाश भागाजे व प्राध्यापक
---------
उत्तम समाज निर्मितीसाठी वाचन अत्यावश्यक
डॉ. सतीश पावसकर; ‘डीवायपी’ टेक्निकल कॅम्पसमध्ये पुस्तक प्रदर्शन
घुणकी, ता. ३१: वाचनातूनच विचार प्रगल्भ होतात, जीवनाला दिशा मिळते. उत्तम समाज निर्मितीसाठी वाचन अत्यावश्यक आहे. मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकाशनाची टेक्निकल तसेच सामाजिक, आत्मचरित्रांची ओळख व्हावी व ती प्रत्येक युवकाने वाचावीत हा प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे मत डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर यांनी येथे व्यक्त केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अधिक आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित
पुस्तकांचे प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये एक हजार पुस्तके ठेवली होती. प्रदर्शनाचे नियोजन रीना गुरुदत्त पाटील यांनी न्यू सायंटिफिक इक्विपमेंटस अँड कंपनी यांच्या सहयोगातून केले. डीन ॲकॅडेमिक्स आर. एस. पवार, रजिस्ट्रार प्रकाश भागाजे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.