गावोगावी अभियान राबवणार

गावोगावी अभियान राबवणार

08344
घुणकी: महाराजस्व अभियान योजना विस्तारीत समाधान योजनेतील लाभार्थी गणपती सुतार यांना दाखला देताना आमदार राजू आवळे. शेजारी कल्पना ढवळे-भंडारे, डॉ. शबाना मोकाशी, सुजाता जाधव, सुभाष जाधव, राजवर्धन मोहिते, धोंडिराम सिद, शहाजी सिद, रमेश पाटोळे, केशव कुरणे आदी.
----------------
गावोगावी अभियान राबवणार
आमदार राजू आवळे; घुणकीमध्ये समाधान योजनेतील लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप
घुणकी, ता. २१ : गरज असताना वारंवार तालुक्याला हेलपाटे मारावे लागणाऱ्या नागरीकांना ''महाराजस्व अभियान''मधून दाखले मिळाले. प्रत्येक नागरीकाची गैरसोय टाळण्यासाठी यापुढेही गावोगावी असे कार्यक्रम राबवणार असल्याची ग्वाही आमदार राजू आवळे यांनी येथे दिली.
महाराजस्व अभियान योजना विस्तारीत समाधान योजनेतील लाभार्थ्यांना विविध दाखल्यांच्या वाटपप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर तहसिलदार कल्पना ढवळे-भंडारे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, निवासी नायब तहसीलदार दिंगबर सानप, सहाय्यक गटविकास अधिकारी उद्धव महाले, विस्तार अधिकारी संतोष पवार, मंडळ अधिकारी अनिता खाडे आदी उपस्थित होते.
तहसिलदार कल्पना ढवळे-भंडारे यांनी प्रत्येक नागरिकाला विनाविलंब सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
शासनाच्या महसुल विभागातर्फे ''महाराजस्व अभियान'' कार्यक्रम २०२३ च्या विस्तारीत समाधान अंतर्गत शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध विभागातील शासकीय सेवायोजनांचा लाभ दिला. त्यामुळे विविध योजनेतील कामे मार्गी लागल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
समाधान योजने अंतर्गत विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे लाभ दिला. तलाठी कार्यालय-(१४५), पुरवठा विभाग-(८५), ग्रामपंचायत विभाग- (८), निवडणूक विभाग- (७७), आरोग्य विभाग-(३०५), कृषी विभाग-(३), आहार पोषण-धान्य वाटप, ॲग्रोवन-(१००), पशुसंवर्धन विभाग- जंत व गोचीड प्रतिबंध औषधांचे वाटप केले. महावितरण -(१८) लाभार्थी विविध समस्या निवारण. आधार कार्ड विभाग-(५०), महा-ई-सेवा विभाग-(६५).
नागरीकांना सामाजिक वनीकरण, कृषी क्षेत्रातील लाभ यासह संजय गांधी- श्रावण बाळ निराधार योजना, एसटी महामंडळ योजने अंतर्गत विभागवार अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. वारणेचे संचालक सुभाष जाधव, राजवर्धन मोहिते, धोंडिराम सिद, पोलिस पाटील संदिप तेली, उपसरपंच केशव कुरणे, आदी उपस्थित होते. सरपंच सुजाता जाधव यांनी स्वागत केले. प्रास्ताविक तलाठी प्रशांत काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी अंकुश गोरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com