सक्षम राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सक्षम राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या
सक्षम राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या

सक्षम राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या

sakal_logo
By

08362
तळसंदे : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात कॅम्पस संचालक डॉ. एस. आर. पावसकर आदी.
-----
सक्षम राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या
डॉ. पावसकर; डीवायपी पॉलिटेक्निकच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
घुणकी, ता. २२ : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी विविध शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. माजी विद्यार्थ्यांनी सक्षम राष्ट्रनिर्मिती कार्यात अधिक योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. एस. आर. पावसकर यांनी केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याचे उदघाटन डॉ. पावसकर यांच्या हस्ते झाले. माजी विद्यार्थ्यांनी डीवायपी संस्थेमध्ये नवीन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सोयीबद्दल नवीन कॅम्पस विकास, जिमखाना, हॉस्टेल, बससुविधा या नवीन सुविधांबद्दल समाधान व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पॉलिटेक्निक समन्वयिका प्रा. कलिका पाटील म्हणाल्या, ‘विद्यार्थी हे सर्व संस्थांचे मूलभूत घटक असतात, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.’ माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट, इंडस्ट्री भेट, ट्रेनिंग, नवीन व्यवसाय निर्मिती याबद्दल मार्गदर्शन केले. राहुल जगताप, प्रतीक्षा निकम, अजय बोराडे, अर्जुन पाटील, प्रसाद टोपले, शिवम परीट, ऐश्वर्या पाटील, अमृता पोवार, स्नेहल पाटील, सुधीर गोरे, प्रणाली पाटील, ऋषिकेश तिखे, एकता मोहिते या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट, ट्रेनिंग, मार्गदर्शन मेळावे यासाठी कॉलेज आणि उद्योग कंपनी यामध्ये सामंजस्य करार करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगितले. पॉलिटेक्निक समन्वयिका प्रा. कालिका पाटील यांनी स्वागत केले. प्रा. विवेक चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अक्षय खामकर यांनी आभार मानले.