Sat, Sept 30, 2023

अंबपला सोमवारपासून विवेक व्याख्यानमाला
अंबपला सोमवारपासून विवेक व्याख्यानमाला
Published on : 26 April 2023, 1:15 am
अंबपला सोमवारपासून व्याख्यानमाला
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील विवेक वाचनालयातर्फे विवेक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष बी. टी. पाटील व कार्यवाह विनायक माने यांनी केले आहे. सोमवारी (ता.१) घुणकीच्या डॉ. श्रीकांत पाटील यांचे ‘युवाशक्ती स्थिती आणि गती’, मंगळवारी (ता. २) कसबा बावड्याच्या मेघना शेळके यांचे ‘जीवन आणि आनंदाचे क्षण’, बुधवारी (ता. ३) कसबे डिग्रजच्या वसंत हंकारे यांचे ‘आनंदी जीवन’, गुरुवारी (ता. ४) नागावच्या स्वाती जंगम यांचे ‘शिक्षणावर बोलू काही’, शुक्रवारी (ता. ५) कुंडलच्या जयवंत आवटे यांचे ‘कथाकथन’ होणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानमाला होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.