वीजेचे वेळापत्रक बदलून दमवू नका!

वीजेचे वेळापत्रक बदलून दमवू नका!

08390
पेठवडगाव: येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन जगताप यांना निवेदन देताना किणी येथील शेतकरी.

--------
वीजेचे वेळापत्रक बदलून दमवू नका!
किणीतील शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनवणी
घुणकी,ता. २८: ‘साहेब नदी उशाशी आहे पण महावितरणच्या धोरणामुळे आम्ही कायमच उपाशी आहोत. निदान उन्हाळ्यात तरी शेतातील रात्रपाळीतील विजेचे वेळापत्रक वारंवार बदलून आम्हाला दमवू नका हो..’ अशी विनवणी किणीतील शेतकऱ्यांनी पेठवडगाव येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली.
पूर्वीप्रमाणे शेतीसाठी विज पुरवठा करावा याबाबतचे निवेदन हातकणंगले तालुक्यातील किणी येथील शेतकऱ्यांनी पेठवडगाव येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन जगताप यांना दिले. १९८५ पासून बारमाही वारणा नदी वाहते. या नदीवर जलसिंचन योजना कार्यान्वित झाल्याने वारणा परीसरातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आली आहे. जगाच्या पोशिंद्याला २४ तास विद्युत पुरवठा मिळायलाच हवा. महावितरणच्या धोरणामुळे काही जलसिंचन योजनाना सोळा तास तर बहुतांश जलसिंचन योजनांसह विहिरीवर अवलंबून असलेल्या शेतीला आठ तास विद्युत पुरवठा होतो. त्यातही वारंवार होणारा खंडित विद्युतपुरवठा यामुळे शेतातील पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
सध्याच्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ऊस पिकांसह भाजीपाला टिकवताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. महावितरणने शेतातील वीजेचे वेळापत्रक वारंवार बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतासाठी रात्रपाळीतील विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे रात्री १२.४५ ते सकाळी ८.४५ यावेळेत ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन वरीष्ठांकडे पाठवून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपकार्यकारी अभियंता सचिन जगताप यांनी दिली. शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे महावीर पाटील, उपसरपंच वैभव कुंभार, शिवसेनेचे शाखाप्रमुख नारायण कुंभार, ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, राजेंद्र पाटील, दशरथ खांडेकर, धिरज चव्हाण, अरंहनाथ पाटील, सचिन पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com