किणीतील अंतर्गत रस्त्यांसाठी २५ लाख रुपये-- आमदार राजू आवळे अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणीतील अंतर्गत रस्त्यांसाठी २५ लाख रुपये-- आमदार राजू आवळे अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन
किणीतील अंतर्गत रस्त्यांसाठी २५ लाख रुपये-- आमदार राजू आवळे अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन

किणीतील अंतर्गत रस्त्यांसाठी २५ लाख रुपये-- आमदार राजू आवळे अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन

sakal_logo
By

08418

किणीतील रस्त्यांसाठी
२५ लाख ः आमदार आवळे

घुणकी, ता. ६ : किणी नेहमीच आवळे कुटुंबीयाच्या पाठीशी राहिले आहे. त्यामुळे निधीही किणी आघाडीवर आहे. अंतर्गत रस्त्यांसाठी २५ लाख रुपये दिले, अशी माहिती आमदार राजू आवळे यांनी किणी (ता. हातकणंगले) येथे दिली. आमदार राजू आवळे यांच्या फंडातील २५ लाखांच्या अंतर्गत रस्त्यांचे उद्‌घाटन आमदार आवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
उद्योजक संजय पाटील यांनी आमदार राजू आवळेंकडे रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. उद्घाटनप्रसंगी उद्योजक संजय पाटील, वारणा दूध संघाचे संचालक ॲड. एन. आर. पाटील, विजयसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दूर सरकार), सरपंच सुप्रिया समुद्रे, उपसरपंच अशोक माळी, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष हंबीरराव पाटील, महावीर पाटील, सुनील पाटील, हर्षद पाटील, जयकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, राजाराम पाटील, संताजी माने, अभय पाटील, सचिन पाटील, प्रियांका पाटील, विद्या पाटील, कुंतूनाथ पाटील, विजय धनवडे, रघुनाथ शेळके, विजय पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.