शेतकऱ्यांना महागाई निर्देशांक लागू करा

शेतकऱ्यांना महागाई निर्देशांक लागू करा

08434
पाडळी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा व उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जनजागृती अभियानात बोलताना शिवाजीराव माने. शेजारी जयवंतराव देसाई, शितल कांबळे आदी.
--------
शेतकऱ्यांना महागाई निर्देशांक लागू करा
शिवाजी माने; पाडळी येथे सांगलीत होणाऱ्या मेळाव्यासाठी जनजागृती अभियान

घुणकी, ता. १२ : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई निर्देशांक काढला जातो. यासाठी त्यांना मोर्चा, संप, आंदोलन करावे लागत नाही. तसा कायदा सरकारकडून त्यांनी करून घेतला आहे. असाच महागाई निर्देशांक शेतकऱ्यांना लागू करा, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी पाडळी (ता. हातकणंगले) येथे केले.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा व उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, या जनजागृती अभियानाबाबत श्री. माने बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंतराव देसाई होते. श्री. माने म्हणाले, ‘जगाची भूक भागवणारा शेतकरीही शेतमाल विकूनच वरील लागणाऱ्या वस्तू अथवा पदार्थ बाजारातून विकत घेत असतो. त्याला त्याच्या उत्पन्नासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये, कुटुंब चरितार्थ खर्चासाठी लागणाऱ्या खर्चासाठी महागाई भत्ता मिळायला नको का? शेतमालाचा मालक असणारा व सहकारी साखर कारखानदारीचा मालक असणाऱ्या शेतकऱ्याला त्याने स्वतः उत्पादित केलेल्या शेतमालाचा दर ठरवण्याचा अधिकार का मिळू नये? आणि हा हक्क मिळवण्यासाठीच नको एफ. आर. पी. हवी एम. आर. पी. हे अभियान घेऊन आम्ही आपल्या गावात आलो आहे. यासाठी लवकरच आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये भव्य शेतकरी मेळावा घेणार आहोत.’
जय शिवराय शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष शितल कांबळे म्हणाले, ‘शेतकरी आणि मजूर हे एका गाडीची दोन चाके आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर मिळाला तरच मजुरांनाही मजुरी वाढवून मिळते. शेतमजुराला जमीन वगैरे नसल्यामुळे कोणतीही बँक अथवा पतसंस्था कर्ज देत नाही.’
उपसरपंच रवी पाटील यांनी स्वागत केले. योगेश पाटील यांनी आभार मानले. वसंतराव मराठे, शिवाजीराव मेथे- पाटील, नितीन पाटील, सर्जेराव जाधव, नारायण पाटील, विलास पाटील, शिवाजी पाटील, राजू पठाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com