वाठार चौकातील प्रश्न त्वरीत सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाठार चौकातील प्रश्न त्वरीत सोडवा
वाठार चौकातील प्रश्न त्वरीत सोडवा

वाठार चौकातील प्रश्न त्वरीत सोडवा

sakal_logo
By

08455
वारणानगर : वाठार येथील विविध प्रश्नांबाबत आमदार डॉ. विनय कोरे यांनी चर्चा केली. महेंद्र शिंदे, विश्वास जाधव, अनिल कंदूरकर आदी उपस्थित होते.
------
वाठार चौकातील प्रश्न त्वरीत सोडवा
आमदार डॉ. विनय कोरे; राष्ट्रीय प्राधिकरण, बांधकाम विभागाला सूचना
घुणकी, ता. १४ : पुणे -बंगळूर महामार्गावरील वाठार हे ठिकाण मध्यवर्ती आहे. येथून वडगाव, हातकणंगले, वारणानगर, रत्नागिरीकडे जाणारे मार्ग असून सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय प्राधिकरणने रस्ते, गटर्सचे प्रश्न त्वरीत सोडवावेत, अशा सूचना आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय प्राधिकरणचे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर गोविंद बरवा व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, हातणंगलेचे अभियंता एस. आर. पाटील व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. भारत माता कॉलनी माने कॉलेज, हिंदमाता कॉलनी बस स्टँडच्या मागील, बसस्थानक परिसरातील, वडगाव व भादोले मार्गावरुन येणारे पाणी, श्रीराम कॉलनी, महाडिक पेट्रोल पंप शेजारील येणारे पाणी निचरा होण्यासाठी मोठे गटर्सद्वारे महामार्गाच्या उत्तरेला असणारी किणी- वठार हद्दीतून पाणी गाव ओढ्यास सोडण्यासाठी नियोजन करावे, वडगाव व भोदोले मार्गाच्या दोन्ही बाजूला आरसीसी गटर्स, महामार्गावर दिशादर्शक फलकासह पर्यटनस्थळांचे फलक लावावेत. महामार्गाच्या पुलाखाली रिप्लेक्टर्स, दिशादर्शक फलक, दक्षिण व उत्तर बाजूस प्रवाशांसाठी सुलभ शौचालय, पोलिस चौकी शेजारील भागाचे सुशोभीकरण करावे, वडगाव वारणा सर्कल शेजारील रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरण की सार्वजनिक बांधकामची हे निश्चित करावे, वाठार -वारणानगर मार्गाच्या दोन्ही बाजूला गटर्स करणे, जुन्या महामार्गाचे डांबरीकरण करावे, दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाची तपासणी करावी. अशा तक्रारींचा पाढाच मांडून वाठार चौकातील समस्यांचे निराकरण करण्याची मागणी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत व गावातील शिष्टमंडळाने केली. अधिकाऱ्यांनी समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. आमदार कोरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
वाठारच्या सरपंच तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पोवार, जेष्ठ नेते नानासो मस्के, ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, महेश कुंभार, सागर कांबळे, महेश शिर्के, अश्विनी कुंभार, रेश्मा शिंदे, रुकसाना नदाफ, शरद बेनाडे, बाबासाहेब दबडे, संदीप चौगुले, पंडित शिंदे आदी उपस्थित होते.