डीवायपी संकुलात क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीवायपी संकुलात क्रीडा महोत्सव
डीवायपी संकुलात क्रीडा महोत्सव

डीवायपी संकुलात क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

08466
तळसंदे: डी. वाय. पाटील कृषी संकुलत वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी प्रा. एक. एस. बंद्रे, प्रा. एक. बी. गाताडे, प्रा. पी. डी. उके आदी.

----
डीवायपी संकुलात क्रीडा महोत्सव
घुणकी, ता. १४ : खेळ मैदानातील असो की जीवनातील खिलाडूवृत्तीने तो खेळला पाहिजे, असे मत प्राचार्य प्रा. पी. एस. पाटील यांनी तळसंदे (ता. हातकणंगले) येथे केले.
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. ॲग्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. पी. एस. पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. कृषी अभियंत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी महाविद्यालयातील स्पर्धांबद्दल माहिती दिली. आपल्या खेळाने ध्यानचंद सर्वांच्या ध्यानात राहिला, असे कर्तृत्व निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार म्हणाले, ‘जेवढा सामना कठीण तेवढ्याच यशाचा गौरवही मोठा असतो. त्यामुळे प्रत्येक सामना जिद्दीने खेळावा.’
क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बुद्धीबळ, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो अशा स्पर्धा झाल्या. क्रीडा समन्वयक प्रा. ए. एस. बंद्रे, अभियंता ए. बी. गाताडे, अभियंता पी. डी. उके, प्रा. आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.