
‘डीवायपी’मध्ये आंबा प्रक्रिया कार्यशाळा
08520
तळसंदे: येथील डी. वाय. पाटील बी. टेक. महाविद्यालयात आंबा प्रक्रिया कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रक्रिया विद्यार्थ्यांनी समजावून घेतली.
------
‘डीवायपी’मध्ये आंबा प्रक्रिया कार्यशाळा
घुणकी, ता. २४ : विद्यार्थ्यांनी कृषी मालावर प्रक्रिया व मूल्यवर्धित व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. या माध्यमातून देश विकासासाठी योगदान देणे शक्य आहे, असे मत कराड येथील प्रॉडक्ट कन्सल्टंट डॉ. नरेंद्र कुमार सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आंबा प्रक्रिया कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये योग्य आंब्याची निवड, रस काढण्यासाठी यंत्राचा वापर, शिजवण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिक दाखवताना त्यातील बारकावे विषद केले. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतः केल्या. कार्यशाळेमध्ये आंबा पल्प, आंबा पोळी, आंबा पावडर, आंबा फ्लेक्स, कैरी पन्हे तयार केले. यासाठी संस्थेच्या तळसंदे फार्म येथील आंबे वापरले. पदार्थ तयार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे हेड फार्म ऑपरेशन ए. बी. गातडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे नियोजन प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी विभागातर्फे पी. डी. उके, डॉ. वाय. व्ही. शेटे, ए. जी. माने यांनी केले.