युवकांचे यश वाचनालयाचा गौरव

युवकांचे यश वाचनालयाचा गौरव

08525
घुणकी : येथील रसिक रंजन वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जीवनराव साळोखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रोते उपस्थित होते.
------
युवकांचे यश वाचनालयाचा गौरव
जीवन साळोखे; रसिक रंजन वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवाचा प्रारंभ
घुणकी, ता. २४: रसिक रंजन वाचनालयाने पन्नास वर्षे वाचन संस्कृती टिकवलीच आणि विचारांचा जागर अखंड तेवत ठेवला म्हणूनच या गावातील युवक स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले. हा वाचनालयाचा गौरव आहे. गावाचे भूषण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी येथे केले.
येथील" रसिक रंजन वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी" वर्षाच्या प्रारंभ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे तज्ज्ञ संचालक शिवाजी माळकर होते. माळकर म्हणाले, रसिक रंजन वाचनालयाची तीन मजली इमारत, २७ हजार पुस्तके असणारे ग्रामीण भागातील एकमेव आदर्श वाचनालय आहे. युवकांनी या वाचनालयाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा.’ गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त संतराम जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्य सेवा परीक्षेतून निवड झालेले तालुका कृषी अधिकारी विराज नामदेव जाधव, हवालदारपदी निवड झालेले मानसिंग चंदर खताळ, राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त संतराम यशवंत जाधव, मुंबई पोलिसपदी निवड झालेले स्वप्निल हंबीरराव सिद यांचा गौरव केला. सकाळी ग्रंथदिंडी गावातील मुख्य मार्गावरुन निघाली. याचे उद्‍घाटन रामचंद्र पाटील यांच्याहस्ते झाले. किणी माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, महावीर पतसंस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, संचालक नामदेव जाधव, भैरवनाथ दूध संस्थेचे संचालक अशोक पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष हिंदूराव पाटील, उपाध्यक्ष हिंदूराव तेली, खजिनदार शंकरराव तेली, संचालक प्रा. तुकाराम खतकर आदी उपस्थित होते. वाचनालयाचे संचालक प्रा. डॉ. अशोक जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन पाहुण्यांची ओळख करून दिली. ग्रंथपाल सर्जेराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह संपतराव पाटील यांनी आभार मानले.
----------
वाचनालयास पुस्तके भेट
व्याख्यानासाठी वक्ते मानधन घेतात. जीवन साळोखे यांनी वाचनालयाचे उपक्रम आणि प्रगती पाहून मानधन न घेता वाचनालयास दहा हजार रुपयांची एक्कावन पुस्तके व स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूलला तीन हजार रुपयांची पंचवीस पुस्तके ग्रंथदान उपक्रमांतर्गत संबंधितांकडे भेट दिली.
---------
‘सकाळ’चे कौतूक
किणी(ता. हातकणंगले) येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास विस्तृत प्रसिद्धी ''सकाळ’मधून दिली. याबद्दल ‘सकाळ’चे पंचकल्याण महोत्सव समितीने कौतूक केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com