श्री गणेश भवनचे भूमिपूजन

श्री गणेश भवनचे भूमिपूजन

08541
अंबप : येथील ‘गणेश भवन’ या नवीन वास्तूचे भूमिपूजन काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याहस्ते झाले. यावेळी रामकृष्ण लोकरे, पी. एन. तोडकर, नंदकुमार पाटील, डॉ. बी. के. पाटील आदी उपस्थित होते.
--------
श्री गणेश भवनचे भूमिपूजन
घुणकी : गणेश सहकार संस्था समूहाने अल्पावधीतच प्रगती केली असल्याचे प्रतिपादन कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी
यांनी केले. अंबप (ता. हातकणंगले) येथील गणेश सहकार संस्था समूहाच्या ‘श्री गणेश भवन’ या नवीन वास्तूचे भूमिपूजन कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पी. एन. तोडकर, नंदकुमार पाटील, अंबप विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील, गणेश महिला पत संस्थेच्या अध्यक्षा अंजना माने, गणेश दूध संस्थेचे अध्यक्षा अनिता डोंगरे, गणेश वाचनालयाच्या अध्यक्षा धनश्री लोकरे, रोहित डोंगरे, विनोद लोकरे आदी उपस्थित होते. गणेश सहकार संस्था समूहाचे संस्थापक रामकृष्ण लोकरे यांनी स्वागत केले. सचिव सतीश नाईक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com