‘डीवायपी कृषी’च्या दोन विद्यार्थ्यांची निवड

‘डीवायपी कृषी’च्या दोन विद्यार्थ्यांची निवड

08573
तळसंदे : येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना निवड पत्र कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी दिले. यावेळी डॉ. जयेंद्र खोत, डॉ. गुरुनाथ मोटे, डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ. विक्रमसिंह इंगळे व प्रा. तेजश्री मगदूम उपस्थित होते.

------
‘डीवायपी कृषी’च्या दोन विद्यार्थ्यांची निवड
घुणकी, ता. ४ : राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता व्यवस्थापन संस्था, तंजावर (तामिळनाडू ) आणि विज्ञान अभियांत्रिकी संशोधन मंडळातर्फे ५ ते ११ जूनदरम्यान होणाऱ्या ‘सूक्ष्मजीव गुणवत्ता हमीसाठी नमुना, स्वयंचलित आणि ओळख साधने’ या विषयावरील उच्चस्तरीय कार्यशाळा व प्रशिक्षणासाठी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेच्या एमएस्सी फूड सायन्स विभागाच्या अक्षता मोरे व काजल तांबवे यांची निवड झाली.
विद्यार्थ्यांना विशेष संशोधन कौशल्ये आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याच्याहेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यशाळासाठी देशातून फक्त २५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यापैकी दोन विद्यार्थिनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या आहेत. निवडीबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत तसेच फूड टेक्नॉलॉजी विभागाचे असोसिएट डीन डॉ. गुरुनाथ मोटे, रिसर्च डायरेक्टर (प्र) व असोसिएट डीन डॉ. संदीप वाटेगावकर यांच्याहस्ते निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. प्रा. तेजश्री मगदूम उपस्थित होत्या. निवडीसाठी सहाय्यक प्राध्यापक (अन्न तंत्रज्ञान) डॉ. विक्रमसिंह इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com