चिकुर्डे पूलानजीक स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकुर्डे पूलानजीक स्वच्छता अभियान
चिकुर्डे पूलानजीक स्वच्छता अभियान

चिकुर्डे पूलानजीक स्वच्छता अभियान

sakal_logo
By

चिकुर्डे पूलानजीक
स्वच्छता अभियान
घुणकी, ता. ६: पारगांव (ता. हातकणंगले) येथील शहाजीराव पाटील तात्या फाऊंडेशनच्या माध्यामातून वारणा नदी चिकुर्डे पूलानजीक जल स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये जलपर्णीसह कचरा काढला.
पारगावचे पोलिस पाटील इंद्रजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशनचे कार्यकर्ते वारणा नदीतील प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करतात. इंद्रजित पाटील यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जलपर्णी व कचरा काढण्याचा उपक्रम राबवतात.
जागतिक पर्यावरण दिन व कार्यकर्ते प्रविण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिकुर्डे पुलानजीक कचरा निदर्शनास आला. तो कार्यकर्त्यांनी काढला. संकलीत केलेला कचरा सुमारे दोन टन होता. हा कचरा सुका झाल्यानंतर विघटन करण्यात येणार आहे. या परिसरातील नदी स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम राबवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा'' घोषणा देण्यात आल्या.