ध्येय निश्चित करून पाठलाग केल्यास यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येय निश्चित करून पाठलाग केल्यास यश
ध्येय निश्चित करून पाठलाग केल्यास यश

ध्येय निश्चित करून पाठलाग केल्यास यश

sakal_logo
By

08592
किणी : येथील आम्ही किणीकर सामाजिक संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्यांचा सत्कार गिरीश शिंदे यांनी केला. ॲड. एन. आर. पाटील, अशोक माळी, बी. डी. मलगुंडे आदी उपस्थित होते.
-----
ध्येय निश्चित करून पाठलाग केल्यास यश
पोलिस निरीक्षक गिरीश शिंदे; ‘आम्ही किणीकर’तर्फे यशस्वितांचा सत्कार
घुणकी, ता. ८ : यश-अपयशाची काळजी न करता आयुष्यातील ध्येय निश्चित करून त्याचा सातत्याने पाठलाग केल्यास निश्चितच उज्ज्वल यश संपादन कराल, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश शिंदे यांनी केले
किणी (ता हातकणंगले) येथील आम्ही किणीकर या सामाजिक संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक ॲड. एन. आर. पाटील होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव हवालदार, अविनाश घाटगे, पोलिस दलात निवड झालेल्या व दहावी बारावीसह विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला.
ॲड. पाटील म्हणाले, ‘संकट काळातील मदतीचा दिलेला हात माणुसकीचे दर्शन घडवते. आम्ही किणीकर संघटनेतर्फे राबविण्यात उपक्रम कौतुकास्पद आहे.’ उपसरपंच अशोक माळी, मुख्याध्यापक बी. डी. मलगुंडे, सुनील पाटील, अशोक खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, संताजी माने, वैभव कुंभार, प्रवीण खोपकर, नरेंद्र घाटगे, रघुनाथ शेळके, राजाराम पाटील, बंदेनवाज मुजावर, सादिक महाबरी, सरिता माळी उपस्थित होते. नंदकुमार माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुबेर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. धीरज चव्हाण यांनी आभार मानले.