
गारगोटी : मुदाळ ग्रा.प. कार्यक्रम
02281
मुदाळला सौरऊर्जेद्वारे पाणीपुरवठा
विकास पाटील; जिल्ह्यातील पहिलीच असल्याचा दावा; स्वनिधीतून उभारणी
गारगोटी, ता. ३ : मुदाळ ग्रामपंचायतीतर्फे १६.५० लाख रुपये खर्चून सौर ऊर्जेवरील नळपाणी पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ग्रामपंचायत निधीतून सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणारी जिल्हयातील पाहिली ग्रामपंचायत मुदाळ असेल, असे गौरवोद्गार माजी सरपंच विकास पाटील यांनी दिली. मुदाळ (ता. भुदरगड) येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई प्रमुख उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीने २० हॉर्सपॉवर सौरऊर्जा पंपिंग सिस्टीमच्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था होणार आहे. यामुळे वीज बिलाचा खर्च कमी होणार आहे. प्रकल्पासाठी स्मार्टग्रामचा निधी १० लाख रुपये आणि १४ व १५ व्या वित्त आयोगातून ६.५९ लाख रुपये निधीतून हा प्रकल्प उभारला आहे.’’
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘‘सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रकल्पातून सुमारे प्रतिदिन साठ हजार लिटर पाणी गावाला पुरवठा होणार आहे. यातून विजेच्या आर्थिक भारात चाळीस टक्के बचत होईल.’’
के. पी. पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचा कळ दाबून प्रारंभ झाला. संग्राम देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा सत्कार झाला. सरपंच शितल माने, उपसरपंच संजय सुतार, सदस्य अनिल पाटील, नारायण पाटील, शांताराम पाटील, रंजना सुतार, कविता सुतार, उज्ज्वला पाटील, ‘बिद्री’चे संचालक अशोक कांबळे, माजी सभापती बापूसो आरडे, भिकाजी चौगले, पांडुरंग पाटील, दिनकर आडसूळ, ग्रामाविकास आधिकारी अशोक जाधव, श्री. साठे आदी उपास्थित होते. संजय माने यांनी आभार मानले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत
मुदाळ ग्रामपंचायतीत ४० वर्षे सक्षम व पारदर्शी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम व योजना यशस्वीपणे राबविल्या. यातून ग्रामपंचायत व सरपंचांचा सन्मान झाला तर शासनाचे विविध पुरस्कार मिळाले. ही ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बँकेत ठेवी ठेवणारी कदाचित एकमेव ग्रामपंचायत असेल, असे गौरवोद्गार माजी आमदार के. पी. पाटील यांनी काढले.
Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03828 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..