गारगोटी : राज्यपुष्प संर्वधन अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : राज्यपुष्प संर्वधन अभियान
गारगोटी : राज्यपुष्प संर्वधन अभियान

गारगोटी : राज्यपुष्प संर्वधन अभियान

sakal_logo
By

19181
भुदरगडमध्ये राज्यपुष्प संवर्धन अभियान
शिक्षण विभागाचा उपक्रम; तालुक्यातील प्रत्येक शाळेत होणार वृक्षारोपण
धनाजी आरडे : सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. ३ : भुदरगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत राज्यपुष्प संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. नवोपक्रमात अग्रेसर असणाऱ्या शिक्षण विभागाने या अभियानातून स्थानिक देशी वृक्ष संवर्धन चळवळीत सहभाग घेतला आहे. यातून प्रत्येक शाळेत एक रोप लावण्यात येत आहे.
कोणत्याही देशाची स्थानिक जैवविविधता व पर्यावरण टिकून राहण्यासाठी तेथील स्थानिक वनस्पती विविधता जपणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक देशी वृक्ष संवर्धन ही एक चळवळ होणे गरजेचे आहे. हाच विचार करून महाराष्ट्र राज्य पुष्प संवर्धन अभियान भुदरगड तालुक्यात राबविण्यात येत आहे.
ताम्हण-जारूळ हा अतिशय सुंदर फुलणारा मध्यम आकाराचा वृक्ष असून, हे आपले राज्यपुष्प आहे. विद्यार्थ्यांना हे कृतीतून समजावे, यासाठी महाराष्ट्र राज्यपुष्प अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भुदरगड तालुक्यातील जंगलात याचे दुर्मिळ अस्तित्व आहे. या सुंदर देशी वृक्षाची, राज्यपुष्पाची संख्या वाढावी म्हणून या अभियानांतर्गत येत्या पावसाळ्यात शालेय परिसरात याचे एक रोप लावायचे व ते वाढवायचे निश्चित केले आहे.
या अभियान अंतर्गत १ जुलैला वृक्षारोपण करायचे आहे. शाळा सुरू झाल्यावर १५ जूननंतर खड्डे काढायचे आहेत. फक्त एकच रोप लावून जगविणे हा सहज शक्य होणारा उद्देश आहे. अभियान शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया व देशी वृक्षसंवर्धनाची चळवळ बळकट करू या, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले आहे. सर्व शाळांना याबाबतची सविस्तर माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभार यांची संकल्पना
कुमार भवन, कडगावचे विज्ञान शिक्षक प्रमोद कुंभार यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. याकामी
निसर्ग मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल चौगुले यांचे सहकार्य मिळाले आहे.

रोप देणार मोफत
विद्यामंदिर कोनवडेच्या मुख्याध्यापिका सुनीता इंगळे, विद्यामंदिर मडिलगे बुद्रुकच्या लतादेवी कुंभार यांच्या वतीने सर्व शाळांना मोफत रोपे दिली जाणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03830 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top