गारगोटी : अपघात एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : अपघात एक ठार
गारगोटी : अपघात एक ठार

गारगोटी : अपघात एक ठार

sakal_logo
By

02283

कलनाकवाडीजवळ
अपघातात एकजण ठार

गारगोटी, ता. ४ : गारगोटी-कोल्हापूर रस्त्यावर कलनाकवाडीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. नामदेव यशवंत देसाई (वय ४०,पाळ्याचाहुडा, ता. भुदरगड) असे मृताचे नाव आहे. अपघाताची भुदरगड पोलिसात नोंद झाली.पोलिसांनी सांगितले, देसाई इचलकरंजी येथे हॉटेलमध्ये काम करीत होते. घरगुती कामासाठी ते आज गावी मोटरसायकल (एम. एच. ०९-३९७०) वरून येत होते. रात्री उशिरा कलनाकवाडीनजीक नामदेव यांच्या मोटरसायकलला गारगोटीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. ते गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तब्बल २५ फूट अंतरावर मोटरसायकल व मृतदेह जाऊन उजव्या बाजूला पडला होता इतकी जोराची धडक बसली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नामदेव यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03831 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top