पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

गारगोटीतून २१ तोळे दागिने चोरीस
गारगोटी, ता. १३ : येथील इंजूबाई कॉलनीतील घरातून भरदिवसा २१ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे. चोरीची भुदरगड पोलिसात नोंद झाली. पोलिसांनी सांगितले, अमोल जनार्दन देसाई यांनी कार्यक्रमानिमित्त बुधवारी बँकेच्या लाॅकरमधून सोने काढून घरी आणले होते. ते घरातील बेडरूममधील टेबलावर ठेवले होते. दरम्यान, पाऊस आल्यामुळे बाहेर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी त्यांची आई साधना बाहेर गेल्या असता हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून टेबलवरील आठ बांगड्या, दोन बिलवर, दोन ब्रेसलेट, आठ अंगठ्या असा सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी बँकेपासून घरापर्यंत पाळत ठेवून सोने लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03840 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top