गारगोटी : मौनी विद्यापीठ निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : मौनी विद्यापीठ निवडणूक
गारगोटी : मौनी विद्यापीठ निवडणूक

गारगोटी : मौनी विद्यापीठ निवडणूक

sakal_logo
By

मौनी विद्यापीठाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर
२५ मेपासून प्रक्रिया सुरू; १९ जूनला मतदान; मतमोजणी; इच्छुकांची मोर्चेबांधणी
गारगोटी, ता. २३ : येथील मौनी विद्यापीठाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विश्वस्त मंडळाच्या दोन व व्यवस्थापन मंडळाच्या एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे. २५ मेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. १९ जुलैला मतदान व मतमोजणी होणार आहे.
मौनी विद्यापीठ या संस्थेचा देशातील पहिले ग्रामीण विद्यापीठ म्हणून नावलौकिक आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदा ही महत्त्वाची ठरलेली संस्था आहे. यामुळे ते येथील सत्तेला अधिक महत्त्व देतात. त्यांचे विरोधक खरोखर रिंगणात उतरणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मौनी विद्यापीठात विश्वस्त मंडळ व व्यवस्थापन मंडळ अशा दोन समित्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील विश्वस्त मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर व्यवस्थापन मंडळाचे आशिष कोरगावकर चेअरमन आहेत. इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकूणच पालकमंत्री पाटील यांच्याबद्दल नाराज व विरोधात असणाऱ्या विरोधकांची भूमिका काय राहील, ते एकत्र येणार काय यावर निवडणूक बिनविरोध होणार की लागणार हे चित्र स्पष्ट होईल.

निवडणूक कार्यक्रम असा
२५ ते ३१ मे ः नामनिर्देशनपत्र दाखल
१ जून - अर्ज छाननी प्रक्रिया
२ ते ९ जून - उमेदवारी अर्ज माघार
९ जून - अंतिम उमेदवार यादी
१९ जून - मतदान व सायंकाळी मतमोजणी
निवडणूक निर्णय अधिकारी ः संचालक डॉ. आर. डी. बेलेकर

संस्थेचे सभासद असे :
आश्रयदाता गट (एक हजार रुपये) ः २ हजार ४९८ सभासद. यात १३० संस्था सभासद.
सामान्य सभासद गट (१०० रुपये) - ५ हजार १०३ सभासद आहेत.

विद्यमान पदाधिकारी
विश्वस्त मंडळ : अध्यक्ष सतेज पाटील. सदस्य - आशिष कोरगावकर, डॉ. संजय डी. पाटील, सौ. शालिनी देसाई
व्यवस्थापन मंडळ : चेअरमन- आशिष कोरगावकर. सदस्य - मधुकर देसाई, माजी आमदार बजरंग देसाई, विश्वनाथ कुंभार, बाजीराव चव्हाण (शासन नियुक्त प्रतिनिधी), सौ. रेश्मा देसाई (जिल्हा परिषद प्रतिनिधी), प्रा. दीपक खोत (कर्मचारी प्रतिनिधी), विशांत भोसले (शिवाजी विद्यापीठ प्रतिनिधी), डॉ. आर. डी. बेलेकर (संचालक).

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03858 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..