गारगोटी : रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : रक्तदान शिबिर
गारगोटी : रक्तदान शिबिर

गारगोटी : रक्तदान शिबिर

sakal_logo
By

२६५३
भोगावती महाविद्यालयात पारितोषिक वितरण
शाहूनगर ः स्पर्धेच्या युगातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व परिश्रम या गोष्टी आत्मसात कराव्यात असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. कुरूकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष जयसिंगराव हुजरे होते. प्राचार्य आर. ए. सरनोबत यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सुनील खराडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांचा श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालक बंडोपंत वाडकर, पी. बी. कवडे, बबनराव पाटील, पी. एस. पाटील, शामराव कोईगडे, उपप्राचार्य आर. बी. हंकारे, डॉ. एन. एम. पाटील, प्रा.विजय काळेबाग प्रा. आर. व्ही. गायकवाड, प्रा. डॉ. डी. ए. चौगले, प्रबंधक अजित कांबळे, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते. प्रा. संजय साळोखे यांनी आभार मानले. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

आकुर्डेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत कोराणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. तर ८२ नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. सरपंच सुहासिनी भांदिगरे यांच्या हस्ते उद्धघाटन झाले. माजी सरपंच अशोकराव भांदिगरे, देवराज बारदेसकर, रवींद्र पारकर, श्रीकांत कांबळे, आनंदी कुपटे, नितीन पाटील, सम्राट मोरे, कृष्णात तेलंग, मुख्याध्यापक सुरेश पाटील, संभाजी कोराणे, लिंगराज स्वामी, जयसिंग पोवार, आर. बी. कांबळे, पांडुरंग सावंत, अशोक पारकर, लिंबाजी कुपटे, महावीर बोरगावे, दीपक कुंभार उपस्थित होते. शिबिरासाठी मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी, महालक्ष्मी ग्रामीण विकास संस्था आकुर्डे यांचे सहकार्य लाभले.


३२९३
प्रणिता पाटील
तमदलगे उपसरपंचपदी प्रणिता पाटील
जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील उपसरंपचपदी प्रणिता सुजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच धनाजी नंदिवाले होते. येथील उपसरपंच सुरेखा पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा घेतली. प्रणिता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम शिरसेट, गौमत कांबळे, सुरेखा पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

02658
भोईटे, पाटील यांचा सत्कार
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील कौलव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक हिंदुराव भोईटे व ग्रंथपाल एम. आर. पाटील यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जी. बी. चरापले होते. भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या हस्ते श्री. भोईटे व श्री. पाटील यांचा सत्कार झाला. यशवंत चांदणे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक ई. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सदाशिवराव चरापले, जी. बी. पाटील, प्रा. अशोक पाटोळे, जी. बी. पाटील, श्री. भोईटे, श्री. पाटील, आशालता सरनाईक यांची भाषणे झाली. प्रा. संदीप टिपुगडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03870 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top