गारगोटी : विरंगुळा केंद्र उद्धघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : विरंगुळा केंद्र उद्धघाटन
गारगोटी : विरंगुळा केंद्र उद्धघाटन

गारगोटी : विरंगुळा केंद्र उद्धघाटन

sakal_logo
By

ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राचे आज उद्‌घाटन
गारगोटी : येथील के. डी. देसाई विरंगुळा केंद्राचे उद्या (मंगळवारी) उद्‌घाटन प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता के. डी. देसाई कॉलनी येथे होईल. माजी आमदार बजरंग देसाई, तालुका संघाचे अध्यक्ष बाळ देसाई प्रमुख उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष देसाई यांनी दिली. ८० ते ९० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होईल. येथे लवकरच ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर, योग वर्ग आणि गुलमोहर आर्ट गॅलरी सुरू करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांना अनेक बैठे खेळ व मनोरंजनाची साधने उपलब्ध केली जातील. या विरंगुळा केंद्रासाठी जमीन व आठशे स्क्वेअर फुटाचे सभागृह डॉ. देसाई यांनी स्वखर्चाने ज्येष्ठ नागरिकांना अर्पण केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03881 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top