गारगोटी : कडगावला रूग्णाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : कडगावला रूग्णाचा मृत्यू
गारगोटी : कडगावला रूग्णाचा मृत्यू

गारगोटी : कडगावला रूग्णाचा मृत्यू

sakal_logo
By

कोट पाहिजे


कडगावला उपचाराअभावी रूग्णाचा मृत्यू
आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा : डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
गारगोटी, ता. २ : कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णावर वेळेत उपचार न झाल्याने प्रवेशद्वारातच रूग्णाचा मृत्यू झाला. केरबा सुभाना दिवेकर (वय ५५, रा. म्हासरंग) अस मृताचे नाव आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.
भुदरगड तालुक्यातील म्हासरंग येथील केरबा सुभाना दिवेकर यांची तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी १०८ रूग्णावाहिकेशी संपर्क साधला. मात्र ही रूग्णवाहिका वेळेवर न आल्याने त्यांना खासगी वाहनातून कडगाव प्राथमिक केंद्रात आणले. तेथे सकाळी साडे आठच्या सुमारास आलेल्या केरबा दिवेकर व नातेवाईक दवाखान्याचा दरवाजा बंद असल्यामुळे भर पावसात उपचारासाठी ताटकळत उभे होते. या वेळी उपचारासाठी डॉक्टरांची विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी डॉक्टर नसल्याचे सांगितले. या वेळी कर्मचार्‍यांनी दरवाजाचे कुलुप काढून रूग्णाला आत घेण्याची तसदी देखील घेतली नाही. काही काळानंतर डॉक्टरांअभावी व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच रुग्णाला जीव गमवावा लागला. या वेळी रूग्णाच्या नातेवाईकांनी रडण्यास सुरुवात केल्यानंतर लोकांनी गर्दी केली. तरीही रूग्णास दवाखान्यात घेतले नाही. या मुळे संतापलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी दवाखान्यातील कर्मचारी व डॉक्टरांना शिव्याची लाखोली वाहिली. तब्बल दोन तास या रूग्णाचा मृतदेह दवाखान्याच्या दारावरच मुलगा घेऊन बसला होता. या मुळे संतापलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी निर्दयी कर्मचारी व सबंधित डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

कडगाव : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात उपचारासाठी बापाला घेऊन आलेला मुलगा.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03893 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top