
गारगोटी : संत बाळूमामा पुण्यतिथी
02357
संत बाळूमामा
आदमापुरात ९ पासून
हरिनाम महासप्ताह
बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
गारगोटी, ता. ६: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. ९ ते १६ ऑगस्ट या कालावधीत भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम महासप्ताह होणार आहे.
या सप्ताहात दररोज प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम होईल. मंगळवारी सकाळी सात वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणापूजनाने हरिनाम सप्ताहाचा प्रांरभ होईल. रोज पहाटे समाधीपूजन, काकड आरती, दिवसा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी राम कृष्ण हरी जप व बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, सायंकाळी सहा वाजता प्रवचन, रात्री नऊ वाजता कीर्तन व भजन असे कार्यक्रम होतील.
प्रवचन व कीर्तनकार असे : ९ ऑगस्ट अशोकराव कौलवकर (गारगोटी) यांचे प्रवचन उदयशास्त्री महाराज (शेळेवाडी-गोटखिंडी) यांचे कीर्तन, १०- पूर्णानंद काजवे (कोगनोळी) यांचे प्रवचन व लक्ष्मण कोकाटे (बारामती) यांचे कीर्तन, ११ -इंद्रजित देशमुख (कोल्हापूर) यांचे प्रवचन व विशाल खोले-पाटील (मुक्ताईनगर) यांचे कीर्तन, १२- नारायण एकल (जोगेवाडी) यांचे प्रवचन व श्रावण अहिरे (नाशिक) यांचे कीर्तन, १३- बाबूराव पाटील (सावर्डे बुद्रुक) यांचे प्रवचन व चिदंबर स्वामी यांचे कीर्तन, १४ -उद्धव जांभळे (निढोरी) यांचे प्रवचन व बाळासाहेब महाराज (देहूकर) यांचे कीर्तन. तसेच दुपारी १२ ते ३ राजा परांजपे प्रतिष्ठान अभंगरंग कोथरूड-पुणे, १५ - प्रशांत सरनाईक (कोल्हापूर) यांचे प्रवचन व भाऊसाहेब पाटील (शेकिन हसूर) यांचे कीर्तन तसेच दुपारी १२ ते ३ साईमाऊली प्रस्तुत भक्ती गीतांचा कार्यक्रम, रात्री दहा वाजता अतुल ताडे यांचे सोलो तबलावादन. -१६ ला सकाळी ७ ते ९ वेदांतकेसरी भाऊसाहेब पाटील यांचे काल्याचे कीर्तन, सकाळी १० वाजता श्रींच्या पालखीचा दिंडी सोहळा व त्यानंतर महाप्रसाद होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03927 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..