गारगोटी : आवश्यक बीडीओ निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आवश्यक बीडीओ निवेदन
गारगोटी : आवश्यक बीडीओ निवेदन

गारगोटी : आवश्यक बीडीओ निवेदन

sakal_logo
By

02359
ग्रामसेविकेच्या
बदलीची मागणी
पारदेवाडीतील ग्रामस्थांचे भोकरेना निवेदन
गारगोटी, ता. ३ : पारदेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मनमानी कारभार करीत असून त्यांची तातडीने बदली करा आणि आम्हाला नवीन ग्रामसेवक द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी भुदरगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिरीष भोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पारदेवाडी ग्रामपंचायतीचा ग्रामसेविका उज्वला जाधव यांच्याकडे दीड वर्षे कार्यभार आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. गावच्या विकासाच्या विविध योजना रखडल्या आहेत असे सांगत ग्रामसेविकाच्या कामाचा पाढा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शिरीष भोकरे व युवक नेते राहुल देसाई यांच्यासमोर मांडला. या कारणावरून त्यांच्या बदलीची मागणी निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी सोमवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्याचे सांगितले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी नवीन ग्रामसेवक देऊ. त्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे सांगितले.
यावेळी सरपंच द्रौपदी मस्कर, उपसरपंच शोभा रेडेकर, सदस्य वैजयंती गवस, आक्काताई सुतार, शंकर सुतार, मारूती डावरे, पांडूरंग सुतार, निवृत्ती रानमाळे, सात्ताप्पा शिर्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03929 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..