गारगोटी : प्रांत कार्यालयास निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : प्रांत कार्यालयास निधी
गारगोटी : प्रांत कार्यालयास निधी

गारगोटी : प्रांत कार्यालयास निधी

sakal_logo
By

प्रांत कार्यालय इमारतीसाठी
सहा कोटी ७८ लाख ः आबिटकर
गारगोटी, ता. ७ : येथील भुदरगड-आजरा प्रांत कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सहा कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याकामी पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला. यामुळे स्वतंत्ररीत्या होणाऱ्या प्रशस्त इमारतीच्या कामाचा लवकरच प्रारंभ होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
भुदरगड व आजरा तालुक्यांसाठी येथे २०१३ मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय मंजूर झाले. या वेळी तात्पुरती सोय म्हणून येथील गावचावडीशेजारील महसूल भवन येथे उपविभागीय कार्यालय सुरू झाले. गारगोटीत अद्ययावत शासकीय इमारती नसल्याने महसूल विभागातील या महत्त्वाच्या कार्यालयाचा कारभार अपुऱ्या जागेतच सुरू झाला. येथील अपुरी जागा व सोयी-सुविधांच्या अभावामुळे अधिकाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे प्रांत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची मागणी होती. मंजूर निधीतून लवकरच येथे नवीन प्रशस्त इमारत उभारण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03935 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..