पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

पोलिस असल्याचे सांगत
गारगोटीत वृद्धेची बोरमाळ पळविली
गारगोटी, ता. ४ : येथे दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करीत वृद्धेची बोरमाळ लंपास केली. याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी सांगितले की, येथील पाटील गल्लीतील श्रीमती तारामती राजाराम भोसले (वय ८०) त्यांच्या घरासमोर उभ्या असताना अनोळखी दोन व्यक्तींनी ते पोलिस असल्याचे सांगून पुढे तपासणी चालू आहे, गळ्यातील दागिने काढून ठेवा अशी बतावणी केली. त्यांनी गळ्यातून काढलेली बोरमाळ कागदामध्ये गुंडाळून देण्याच्या बहाण्याने कागदात गुंडाळून ठेवलेले खडी- दगड पुढे करीत हातचलाखी करून बोरमाळ काढून घेऊन फसवणूक केली. यानंतर ते मोटारसायकलवरून क्रांती चौकाकडे निघून गेले. ते अंदाजे ३५ ते ४५ वर्षाचे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरिता पोलिस उपनिरीक्षक देशमुख व पोलिस कर्मचारी रवाना केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03972 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..