वाघापुरात ३४६ रूग्णांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघापुरात ३४६ रूग्णांची तपासणी
वाघापुरात ३४६ रूग्णांची तपासणी

वाघापुरात ३४६ रूग्णांची तपासणी

sakal_logo
By

02467
वाघापूर : येथे आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन करताना अमित देसाई. शेजारी शिवाजी ढेंगे, प्रकाश कुलकर्णी, आण्णासो जठार, दिलीप कुरडे.

वाघापुरात ३४६ रुग्णांची तपासणी
गारगोटी : नवोदय संस्था ग्रुपने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवून आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे यांनी केले. वाघापूर (ता. भुदरगड) येथे नवमहाराष्ट्र क्रेडिट सोसायटी, नवोदय दूध संस्था व सिद्धगिरी हॉस्पिटल यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते. अमित देसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्रकाश कुलकर्णी होते. यावेळी ३४६ रुग्णांची तपासणी झाली. दूध उत्पादकांना बक्षीस वितरणही झाले. यावेळी हिंदुराव जठार, एम. डी. जठार, मारुती दाभोळे, आण्णासो जठार, कोंडिबा बरकाळे, पांडुरंग कामिरकर, तानाजी कुरडे, किरण कुरडे, संग्राम दाभोळे, सुनील जठार, समाधान पाटील, विजय जठार, धनाजी कुंभार, प्रा. धनाजी आरडे, किशन जठार, सागर कांबळे, दीपक परीट उपस्थित होते. अध्यक्ष बाबासाहेब जाधव-भोई यांनी स्वागत केले. संस्थापक अनिल कामिरकर यांनी आभार मानले.