गारगोटी : गंगापुरात कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : गंगापुरात कार्यक्रम
गारगोटी : गंगापुरात कार्यक्रम

गारगोटी : गंगापुरात कार्यक्रम

sakal_logo
By

०२५२०
गंगापूर : येथील विकासकाम प्रारंभावेळी आमदार आबिटकर. शेजारी पंडितराव केणे, प्रकाशराव कुलकर्णी, दत्तात्रय उगले व इतर.

गंगापुरात विविध विकासकामांचा प्रारंभ
गारगोटी, ता. ११ : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे निधी मिळवून मार्गी लावली. यापुढेही भरीव निधी आणून प्रस्तावित कामे मार्गी लावू, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. गंगापूर (ता. भुदरगड) येथे विविध फंडांतून मंजूर ४ कोटी ५८ लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. सरपंच सीमा कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. राहुरी कृषी विद्यापीठाचे सदस्य दत्तात्रय उगले, हुतात्मा स्वामी-वारके सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, प्रकाशराव कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
नळपाणी पुरवठा योजनेला २ कोटी १४ लाख, पाणंद रस्ते १ कोटी २० लाख, पाझर तलाव अस्तरीकरण व विस्तारीकरणाच्या प्रस्तावित कामासाठी ९० लाख, मराठानगरात रस्ते व गटारी २० लाख, हरिजन वसाहतीत सभा मंडप १० लाख, सार्वजनिक स्वच्छतागृह ३ लाख आदी कामांचा प्रारंभ झाला. तानाजी जाधव यांनी स्वागत केले. उपसरपंच सीताराम माने, जनार्दन पाटील, भीमराव किल्लेदार, गणपतराव पाटील, पंडितराव पाटील, भैरू गुरव, मारुती सुतार, मारुती तोरस्कर, आनंदा कांबळे, राकेश लोकरे, कृष्णात सुतार, किशोर गोडसे, दिगंबर गुरव, शहाजी देसाई, बाळासो शिंदेंसह ग्रामस्थ उपस्थित होते. अजित जाधव-पाटील यांनी आभार मानले.