गारगोटी : वाहन वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : वाहन वाटप
गारगोटी : वाहन वाटप

गारगोटी : वाहन वाटप

sakal_logo
By

02544
गारगोटी : वाहन व कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप करताना आमदार आबिटकर व बँक अधिकारी.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रमांतर्गत वाहनांचे वाटप

गारगोटी, ता. १४ : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत आज राधानगरी विधानसभा मतदारसंघातील १६ हून अधिक लाभार्थ्यांना फिरता व्यवसाय करण्यासाठी वाहन व १२ हून अधिक लाभार्थ्यांना इतर व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मंजूर केली. या वाहन व कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित झाले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘राज्य सरकारने बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू केली आहे. या योजनेतून तरुणांना आर्थिक सहाय्य होते. यामुळे मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींनी योजनेचा लाभ घ्यावा आणि उद्योग, व्यवसायाकडे वळावे. स्वतःचे उद्योग उभे करून स्वावलंबी व्हावे.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. शेळके, अग्रणी बँकेचे मॅनेजर गणेश गोडसे, स्टेट बँक पिंपळगावचे मॅनेजर सुरज डकरे, खानापूर बँकचे मॅनेजर, प्रवीण पाटील, बिद्री बँकेचे मॅनेजर सूर्यकांत माळी, विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर विद्याधर पितांबरे, राधानगरी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ चौगले, भुदरगड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे, राशिवडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर धुंदरे, उपाध्यक्ष समाधान परीट, सचिव अक्षय नकाते, येळवडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष धनाजी कांचनकर, उपाध्यक्ष रंगराव सारंग, रमेश कारेकर, श्री. पाटकर, सुनील शहा, राजू आमणगी, सुनील कापसे, सदाशिव खेगडे, आल्ताफ बागवान, रणधीर शिंदे, राजू वाडेकर, विजय सारंग यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.