गारगोटी : आवश्यक रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आवश्यक रास्ता रोको
गारगोटी : आवश्यक रास्ता रोको

गारगोटी : आवश्यक रास्ता रोको

sakal_logo
By

‘बिद्री’च्या दरप्रश्नी उद्या
मुदाळतिट्टा येथे ‘रास्ता रोको’
गारगोटी, ता. १६ : बिद्री कारखान्यातर्फे चालू गळीत हंगामातील उसाला ‘एफआरपी’पेक्षा अधिक ५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी मुदाळतिट्टा येथे शुक्रवारी (ता. १८) सकाळी साडेदहाला रास्ता रोको आंदोलन होणार आहे. बिद्री कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह विरोधी आघाडीतर्फे हे आंदोलन होईल. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी जाहीर केलेला प्रतिटनास ३२०९ रुपये ऊसदर हा कारखाना एफआरपीप्रमाणेच आहे. ‘बिद्री’चा सहजीव प्रकल्प कर्जमुक्त झाला असून, त्यातून मिळणारा नफा सभासदांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे एफआरपीपेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा द्यावा, असे निवेदन विरोधी आघाडीमार्फत कारखाना प्रशासनास देण्यात आले होते. परंतु, कारखाना प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर ‘रास्ता रोको’ करणार असल्याचे निवेदन भुदरगड व मुरगूड पोलिसांना दिले आहे. निवेदनावर ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, यशवंत नांदेकर, अरुण जाधव, अशोकराव फराक्टे आदींच्या सह्या आहेत.