गारगोटी : फुटबॉलला मिळू दे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : फुटबॉलला मिळू दे बळ
गारगोटी : फुटबॉलला मिळू दे बळ

गारगोटी : फुटबॉलला मिळू दे बळ

sakal_logo
By

गारगोटीच्या
फुटबॉलचा इतिहास

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा जर्मनीने पोलंडवर हल्ला केला. तेव्हा तेथील नागरिक जगभर पसरले. अशा निर्वासित लोकांपैकी काही जणांची तुकडी कोल्हापुरात येऊन राहिली. या पोलंडवासीयांकडून कोल्हापूरकर फुटबॉल कसा खेळायचा हे शिकले. त्याचबरोबर त्यांच्यामुळे बूट घालण्याची भीती हळूहळू कमी झाली. त्यानंतर हळूहळू फुटबॉल हा खेळ कोल्हापूरच्या आसपास असलेल्या ग्रामीण भागामध्ये खेळू लागले.
- अमित जाधव, गारगोटी.
----------------------------

गारगोटीसारख्या ग्रामीण व दुर्गम भागामध्येही काही नामवंत खेळाडू होऊन गेले. त्यामध्ये (कै) दत्तात्रय उर्फ नानासो सापळे, (कै) जे. के. भोसले, (कै) आर. टी. चौत्रे, (कै) चंद्रकांत नलवडे यांनी त्यांच्या काळात मैदान गाजवले आहे. गारगोटी सुपुत्र (कै) दत्तात्रय उर्फ नानासो सापळे यांनी पोलिस संघातून सन १९६८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळाचे कौशल्य दाखवले. त्यानंतर गारगोटीच्या फुटबॉलला नवचैतन्य आणण्याचे काम (कै) जे. के. भोसले व (कै) आर. टी. चौत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू काझी, शशिकांत नलवडे, भिकाजी पाटील, बाळू पाटील, शिवाजी बोटे आदींनी गारगोटी फुटबॉल असोसिएशनची स्थापना २००७ मध्ये करून केले. त्याकाळी गारगोटीसारख्या ग्रामीण भागात फुटबॉल साहित्याची कमतरता भासत असे. लागणारे क्रीडा साहित्य प्रा. नागरगोजे यांच्या सहकार्याने कर्मवीर महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.
ग्रामीण भागातील खेळांडूकडे सामर्थ्य व तग धरण्याची क्षमता आहे. परंतु फुटबॉलमधील कौशल्यांची कमतरता असल्याचे जाणवले. यामुळे दीपक कुपन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली गारगोटी फुटबॉल असोसिएशनने फुटबॉल शिबिरांचे व फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले. त्यामध्ये शेकडो लहान व मोठया वयोगटातील खेळाडूंनी तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणाचे धडे घेतले. त्याचा परिणाम म्हणून २२ वर्षामध्ये पहिल्यांदाच गडहिंग्लज येथे प्रतिष्ठेचा घाळी चषक स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला. सध्या गारगोटीमध्ये १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व खुल्या गटातील असे संघ सराव करताना दिसतात. तसेच कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (KSA) आयोजित ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये मैदान गाजवताना दिसतात. लहान व खुल्या वयोगटातील खेळाडूंना आधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी संजय मेटल, युवराज नाटले, संतोष राजिगरे, सतीश देसाई व इतर खेळाडू धडपडताना दिसतात. लोकवर्गणी व फुटबॉल शौकिनांच्या सहकार्याने फुटबॉल रणसंग्रामसारख्या स्पर्धेचे नेटके नियोजन केले जाते.
या स्पर्धेमध्ये गारगोटीसह गडहिंग्लज, कोल्हापूर, मिरज, निपाणी व बेळगाव येथील नामवंत संघांना निमंत्रित केले जाते. भविष्यात गारगोटीतील फुटबॉलपटूंना क्रीडाप्रेमी, शैक्षणिक संस्था यांच्या मदतीची आवश्यकता असून गारगोटीच्या फुटबॉलचे भविष्य नक्कीच उज्वल असेल याची खात्री वाटते.