गारगोटी : आवश्यक ''अ'' मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आवश्यक ''अ'' मानांकन
गारगोटी : आवश्यक ''अ'' मानांकन

गारगोटी : आवश्यक ''अ'' मानांकन

sakal_logo
By

02808

कर्मवीर हिरे महाविद्यालयास
नॅकचे ‘अ’ मानांकन
गारगोटी, ता. १५ : येथील श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक), बंगळूर यांच्याकडून ‘अ’ दर्जा मानांकन मिळाला. १० व ११ फेब्रुवारीला महाविद्यालयास नॅकच्या तीन सदस्यीय समितीने भेट देऊन तपासणी केली होती.
पाच वर्षांत महाविद्यालयाने विविध उपक्रम राबविले. यासह सर्व सेवा-सुविधांची पाहणी करून तीन सदस्यीय समितीने मूल्यमापन केले होते. या समितीचे प्रमुख अवदेश प्रतापसिंह विद्यापीठ, रेवाचे (मध्यप्रदेश) अधिष्ठाता प्रा. डॉ. सुनील कुमार तिवारी, समन्वयक म्हणून गुजरात राज्य माहिती व ज्ञानस्त्रोत केंद्र, अहमदाबादचे माजी प्रमुख डॉ. नरेन्द्र चोटालीया व सदस्या नाझरेथ महाविद्यालय, चेन्नई (तामिळनाडू) च्या प्राचार्या डॉ. मेरी अंजेलिन संथोसम होते. समितीने विविध सात निकषांच्या आधारे मूल्यमापन केले. या निकषाच्या आधारावर महाविद्यालयास ‘अ’ दर्जा मिळाला.
मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, चेअरमन मधुकर देसाई, विश्वस्त पल्लवी कोरगावकर, कर्मचारी प्रतिनिधी प्रा. अरविंद चौगले, संचालक व प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याकामी समन्वयक डॉ. सागर व्हनाळकर, प्रा. चेतन भगत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.