
गारगोटी : १४ कोटीचा निधी
ग्रामसडक योजनेतून १४ कोटींवर
निधी : आमदार आबिटकर
गारगोटी, ता. १९ : राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा–२ आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी १४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने निधी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील म्हासूर्ली ते मानेवाडी धनगरवाडा ३.८२ किमी रस्त्यासाठी ३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर झाला. भुदरगड तालुक्यातील बेडीव ते झुलपेवाडी तालुका हद्द ५.१८ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झाला. आजरा तालुक्यातील शेळप, आंबार्डे, लिंगवाडीत ६.७१ किमी रस्त्यासाठी ५ कोटी ५३ लाखांचा निधी मंजूर झाला.
म्हासुर्ली ते मानेवाडी रस्त्यामुळे धनगरवाड्यावरील नागरिकांची मागणी पूर्णत्वास जाणार आहे. बेडीव ते झुलपेवाडी तालुका हद्द रस्ता खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. शेळप-आंबार्डे-लिंगवाडी रस्त्याचे शेळपपर्यंत काम पूर्ण झाले. रस्ता आंबोलीपर्यंत जात असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची रहदारी वाढेल. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल.