गारगोटी : आवश्यक आदमापूर बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आवश्यक आदमापूर बैठक
गारगोटी : आवश्यक आदमापूर बैठक

गारगोटी : आवश्यक आदमापूर बैठक

sakal_logo
By

02837
भाविकांच्या सोयी-सुविधांवर भर द्या
वसुंधरा बारवे; आदमापुरात भंडारा यात्रा नियोजन बैठक
गारगोटी, ता. ७ : संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आवश्यक सेवा-सुविधा मिळाव्यात. भाविकांना वेळेत दर्शन, महाप्रसादाचा लाभ घेता येईल, पार्किंग समस्या, वाहतुकीची कोंडी होणार नाही असे नियोजन करा. याकामी शासकीय यंत्रणेची मदत घ्या, अशा सूचना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केल्या.
आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा मंदिर सभागृहात भंडारा यात्रेनिमित्त नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या. तहसीलदार अश्विनी आडसूळ, देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सरपंच विजय गुरव प्रमुख उपस्थित होते. भंडारा यात्रा उत्सवास १२ मार्चला प्रारंभ होईल. १९ व २० मार्चला मुख्य यात्रा व विविध कार्यक्रम होतील.
यात्रेची गर्दी, नियंत्रण व्यवस्था, पोलिस यंत्रणा, रथ मिरवणूक, महाप्रसाद, पाणीपुरवठा, आरोग्याचा प्रश्न, अतिक्रमण, विक्रेते, बेशिस्त पार्किंगमुळे होणारे अडथळे आदींवर चर्चा झाली. यानंतर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी आडसूळ यांनी मंदिर परिसराची पाहणी करत उपाययोजना सुचविल्या. धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी, सरपंच विजय गुरव, व्यवस्थापक अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कणसे यांनी यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणी सांगत शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे; असे आवाहन केले. यावेळी माजी सरपंच दिनकरराव कांबळे, दत्तात्रय पाटील, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामसेवक डी. बी. माने यांनी आभार मानले.