गारगोटी : आवश्यक तहसीलला निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आवश्यक तहसीलला निधी
गारगोटी : आवश्यक तहसीलला निधी

गारगोटी : आवश्यक तहसीलला निधी

sakal_logo
By

भुदरगड तहसीलच्या इमारतीस १४ कोटी ७० लाखांचा निधी

गारगोटी : येथील भुदरगड तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाचा प्रारंभ होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. शासनाचा प्रमुख व अविभाज्य घटक असलेल्या महसूल विभागाचा कारभार येथील भुदरगड तहसील कार्यालयात जुन्या इमारतीत अपुऱ्या जागेमध्ये सुरू होता. याच इमारतीत तहसील कार्यालयासह इतर अनेक शासकीय विभाग एकत्रितपणे जुन्या इमारतीतच कार्यरत आहेत. ही इमारत अतिशय जुनी व जीर्ण झालेली आहे. अपुऱ्या व जुन्या इमारतीत काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. यामुळे नागरिकांना सर्व सेवासुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी नवीन सुसज्ज मध्यवर्ती इमारतीची मागणी होत होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तहसीलच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सहकार्य लाभले.