गारगोटी : भंडारा उत्सव सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : भंडारा उत्सव सुरू
गारगोटी : भंडारा उत्सव सुरू

गारगोटी : भंडारा उत्सव सुरू

sakal_logo
By

02845
आदमापूर : संत बाळूमामा भंडारा उत्सवाचा प्रारंभ वीणापूजनाने करताना अध्यक्ष धैर्यशील भोसले व वारकरी बांधव.

आदमापुरात बाळूमामांचा
भंडारा उत्सव सुरू

गारगोटी, ता. १२ : महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास रविवारी(ता.१२) प्रारंभ झाला. धार्मिक वातावरणात झालेल्या कार्यक्रमास भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संत बाळूमामांच्या या उत्सवानिमित्त दररोज विविध कार्यक्रम होतील. २० मार्चला मुख्य भंडारा यात्रा होईल. देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन, अभिषेक झाले. याप्रसंगी भजन, धनगरी ढोल वादन कार्यक्रम झाले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली आहे. यावेळी सचिव रावसाहेब कोणकेरी, पुंडलिक व्होसमनी, रामण्णा मरेग्रुद्री, तमाण्णा मासरेडी, संदीप मगदूम, सरपंच विजय गुरव, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, नानासाहेब पाटील, बाळकृष्ण परीट आदी उपस्थित होते.
...