गारगोटी : १८ लाखांचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : १८ लाखांचा निधी
गारगोटी : १८ लाखांचा निधी

गारगोटी : १८ लाखांचा निधी

sakal_logo
By

‘मुख्यमंत्री ग्रामसडक’साठी
१८ कोटी ८ लाख
आमदार आबिटकर; राधानगरीत २४.४० किमीचे काम

गारगोटी, ता. १५ : राधानगरी विधानसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत २४.४० किलोमीटर रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी १८ कोटी ७ लाखांचा निधी मंजूर झाला, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
श्री. आबिटकर म्हणाले, ‘राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी मिळाला. प्रत्येक गावाचा समतोल विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी ते तारळे खुर्द रस्ता ३ कोटी २३ लाख, राजापूर फाटा ते राजापूर रस्ता २ कोटी ६५ लाख, मेनरोड भटवाडी ते भटवाडी (ओलवण) रस्ता २ कोटी ५ लाख, फेजिवडे ते भोसलेवाडी रस्ता १ कोटी ८४ लाख आदी कामांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील भालेकरवाडी फाटा ते भालेकरवाडी गाव रस्ता ९० लाख, पाळ्याचाहुडा ते चाफेवाडी रस्ता २ कोटी ३७ लाख, मठगांव ते खोतवाडी रस्ता २ कोटी ६१ लाख आदी कामांचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील देवर्डे फाटा ते देवर्डे पारेवाडी रस्ता १ कोटी ३१ लाख, पेरणोली ते नावलकरवाडी रस्ता २ कोटीचा समावेश आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले.