
गारगोटी : पाऊस सुधारित बातमी
2857 व 2856
गारगोटी : अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी शहराला झोडपले.
गारगोटी : पावसामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली होती.
गारांसह अवकाळीने
गारगोटीला झोडपले
विजांचा लखलखाट, नागरिकांची तारांबळ
सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. १५ : गारगोटीसह परिसरात बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने तासभर झोडपून काढले. विजेचा लखलखाट आणि गारांचा मारा करीत पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसामुळे आठवडा बाजार विस्कळीत झाला. मार्चमध्ये असा पाऊस प्रथमच अनुभवल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक ढग जमून विजेच्या कडकडाट व जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. सलग एक तासाहून अधिक वेळ पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाजारपेठेतून पाणी वाहू लागल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली. गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. काही शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या भाजीपाला व इतर साहित्याचे नुकसान झाले. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
बाजारपेठेत पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. परिसरात शेतीकामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची, वाहनधारकांची ये-जा करताना धावपळ उडाली होती. पावसामुळे अनेक कामे काही काळ ठप्प झाली. विशेषतः गावभागासह शहरातील अनेक प्रभागात पावसाचे जोरदार पाणी वाहू लागले. पाणी घरामध्ये पाणी येऊ नये, यासाठी अनेक कुटुंबांची कसरत सुरू होती. मौनी विद्यापीठाच्या प्रशस्त क्रीडांगणावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
या वर्षातील पहिल्याच अवकाळी पावसाने शहरात जोरदार सलामी दिली. तासाभरातील पावसाने मोठी दयनीय अवस्था केली. आठवडा बाजारानिमित्त आलेल्या विक्रेते, व्यापारी, नागरिकांची गैरसोय झाली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतीतर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
- प्रकाश वास्कर, सदस्य, ग्रामपंचायत गारगोटी
----------
फोटो : got152.jpg व got153.JPG
गारगोटी : येथील बाजारपेठेत वाहणारे पावसाचे पाणी. दुसऱ्या छायाचित्रात मौनी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर साचलेले पावसाचे पाणी.